टीम AM : महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचे ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटातील ‘सखूबाई’ हे पहिले धमाकेदार गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘वीजी’ फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ हा मराठी चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रेक्षकांना ठेका धरायला लावणारा धमाकेदार आयटम नंबर जल्लोषमय आहे. ‘सबसे कातिल’ गौतमी पाटीलआणि ‘एनर्जेटिक’ अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी या गाण्यात चारचांद लावले आहेत. या गाण्याला संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. तर, चैतन्य कुलकर्णी यांनी लिहिलेले हे गाणं सोनाली सोनावणे हिने गायले आहे.
‘हे आयटम सॉंग करताना आम्हाला खूप मजा आली असून हे आयटम साँग प्रेक्षकांना ठेका धरायला लावेल, असा विश्वास या दोन्ही कालाकारांनी व्यक्त केला. चित्रपटातील गौतमी पाटीलचा हॉट आणि सिद्धार्थ जाधवचा कूल अंदाज प्रेक्षकांसाठी भन्नाट तडका देणार आहे हे नक्की.