टीम AM : अंबाजोगाई शहरात पोलीसांच्या घरी चोरी झाल्याची घटना ताजी असतानाचं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अपर जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाच्या परिसरातून चंदनाच्या झाडाची चोरी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाईतील अपर जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी असलेलं चंदनाचं झाड अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरी केलं. चोरट्यांनी संधी साधत झाड कापून नेल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या चोरीमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेचा गुन्हा अद्याप नोंद झाला नसल्याची माहिती मिळाली आहे.