टीम AM : अंबाजोगाईत पावसाने गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. सतत रिमझीम पावसामुळे गेल्या दोन – तीन दिवसापांसून ढगाळ वातावरण पहावयास मिळत आहे. त्यातच कालपासून पावसाचा जोर आणखी वाढला असून आज शनिवार रोजी संततधार सुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, शहरातील काही भागात नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अंबाजोगाईत 25 जुलैपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या सरी कमी – अधिक प्रमाणात सुरूच आहेत. अंबाजोगाई शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यातच पावसाचा जोर कायम आहे.
अंबाजोगाईत काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. काही वेळ पावसाचा जोर थोडा वाढतही आहे. त्यातच पावसामुळे हवेत गारवा वाढला असून नागरिक उबदार कपडयांचा वापर करीत आहेत. अंबाजोगाई शहरासह तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. विशेषत: सखल भागात पाणी साचल्याने तेथून नागरिकांना चालताना कसरत करावी लागत आहे.