सापाला चक्क ट्रॅक्टरच्या चाकाखाली टाकलं चिरडून : व्हिडिओ व्हायरल, वाचा…

टीम AM : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका ठिकाणी चक्क सापाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून टाकलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहू सगळेच संतापले आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीनं शेतात आलेल्या सापाला अक्षरश: ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून टाकलं आहे. यावेळी हा तरुण सुरुवातीला सापाची शेपटी चिरडून टाकतो आणि नंतर संपूर्ण सापाच्या अंगावरुन चाक नेतो. यावेळी साप तडफडताना दिसत आहे. मात्र तरीही या तरुणाला दया आली नाही.

हा व्हिडीओ deepak.yadav.dinara नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिलीय, ‘घाबरु नको शेवटी इथेच फेडायच ए तुला, देवापेक्षा कर्म मोठे आहेत भाऊ हिशोब होणार’ तर आणखी एक म्हणतो, “कर्म फिरून येतंच लक्षात ठेवा”.