शुभांगी शिंदे हुंडाबळी प्रकरणातील फरार आरोपीस तात्काळ अटक करा : सजग अंबाजोगाईकर

उपजिल्हाधिकारी यांना दिले ‌निवेदन : महिलांची मोठ्या संख्येने ‌उपस्थिती

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथील शुभांगी शिंदे हुंडाबळी प्रकरणातील राजकिय वरदहस्त असलेल्या फरार आरोपीस तात्काळ अटक करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. जेणेकरून समाजात अन्य कोणीही हुंडा घेणे किंवा देणे या प्रकारास आळा बसेल, या प्रकारच्या मागणीचे निवेदन सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांना आज दिनांक ‌17 जून ‌रोजी दिले आहे. निवेदन देण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

हे निवेदन देतांना जेष्ठ नागरिक संघाचे ॲड. अनंतराव जगतकर, मनस्विनी महिला प्रकल्पाच्या अरुंधती लोहिया, रोटरी क्लबचे धनराज सोळंकी, ‘इनरव्हील’ क्लबच्या खंडाळे मॅडम, डॉ. नरेंद्र काळे, ‘आयएमए’ चे डॉ. राजेश इंगोले, साहित्य परिषदेचे डॉ. राहुल धाकडे, शिक्षक मैत्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय रापतवार, शुभांगी शिंदेचा भाऊ प्रदीप साळुंके यांच्यासह शहरातील विविध शाळांतील अनेक विद्यार्थी, शिक्षक तथा शिक्षिका यांच्यासह अंबाजोगाईकर उपस्थित होते.