टीम AM : बॉलिवूड अभिनेत्री जिनेलिया हिने आज (दि.10) वटपौर्णिमेच्या निमित्ताने खास प्रार्थना केली आहे. जिनेलियाने तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुख याच्या दिर्घआयुष्यासाठी देवाकडे खास पद्धतीने प्रार्थना केली आहे. जिनेलियाने या संपूर्ण विधीचा खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यावेळी जिनेलियाने देवापुढे लोटांगण देखील घातलं आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनेलिया यांची जोडी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. रितेश आणि जिनेलिया सोशल मीडियावर एकत्रितपणे नेहमी रील्स शेअर करताना पाहायला मिळतात. सोशल मीडियावर रितेश आणि जिनेलियाच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. दोघांच्या रील्सवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात. वटपौर्णिमेच्या निमित्ताने शेअर केलेल्या जिनेलियाच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शविली आहे. सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांची 2002 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर भेट झाली होती. हा दोघांचा पहिलाच चित्रपट होता आणि शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले आणि 2012 साली त्यांनी लग्न केलं. रितेश आणि जेनेलियाला रियान आणि राहेल असे दोन मुले आहेत.