जून ते सप्टेंबर कालावधीत 103 टक्के पाऊस होईल : काय आहे अंदाज ? वाचा…

टीम AM : जून ते सप्टेंबर कालावधीत देशात सरासरीच्या सुमारे 103 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विषयक खासगी संस्था ‘स्कायमेट’ ने व्यक्त केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, यंदाचा पावसाळा देशासाठी सकारात्मक ठरण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. 

यंदाच्या मान्सून हंगामात ‘ला निना’ स्थिती कमकुवत राहण्याची शक्यता असून, ‘अल निनो’ चा फारसा प्रभाव जाणवणार नाही. त्यामुळे देशात एकंदर मान्सूनची स्थिती अनुकूल राहण्याची शक्यता ‘स्कायमेट’ ने व्यक्त केली आहे. 

जलसंधारण, पाणीसाठा व्यवस्थापन आणि शेती योजना आखण्यासाठी हा अंदाज उपयुक्त ठरणार आहे.