टीम AM : अंबाजोगाई शहरात आंतरराष्ट्रीय सहकार दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज दिनांक 4 फेब्रुवारी मंगळवार रोजी ही दिंडी अंबाजोगाईत सकाळी पोहचली. यावेळी सहकार क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
स्वर्गीय वैकुंठ भाई मेहता सहकार दिंडीचे आयोजन महाराष्ट्र शासन सहकार खाते, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार परिषद – 2025 ही शिर्डी येथे 9 फेब्रुवारी रोजी होत आहे. या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये 40 देशाचे प्रतिनिधी, भारत देशाचे सहकार मंत्री अमित शहा, तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच अनेक मंत्री महोदय आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. इतिहासाच्या कालखंडामध्ये मैलाचा दगड ठरणारी ही ऐतिहासिक परिषद होणार आहे.
या परिषदेचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही सहकार दिंडी आज अंबाजोगाई शहरांमध्ये दाखल झाली. या दिंडीचे पूजन गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजकिशोर मोदी, सहाय्यक निबंधक कुलकर्णी, सहकार अधिकारी संतोष भंडारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव लक्ष्मणराव गोरे, परळीचे बाजीराव धर्माधिकारी, भगवानदास सारडा, कचरूलाल सारडा, ‘एपीसी’ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशपांडे, शेख सर, गोविंद येडे, अशोक वैद्य, फारुकी सर, रघुनाथ जगताप, रिकबसेठ सोळंकी, बाबा शिरसाट, प्रा. अरुणराव अर्धापूर, मनोज देशमुख, विजय राऊत, गजानन कुलकर्णी बाळासाहेब माने, बी. एस. घाडगे राजू मोरे, तानाजी जाधव, बिबीषन देशमुख, नाथ रेड्डी, ॲड. सुनील सौंदरमल, डॉ. राहुल धाकडे यांच्यासह अंबाजोगाई, परळी, घाटनांदुर परिसरातील सर्व पतसंस्थांचे अध्यक्ष, संचालक आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या दिंडीत महिलांची संख्याही लक्षणीय होती. दिंडीत सहभागी झालेल्या सर्वांचे संयोजन समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.