टीम AM : जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी 20 जानेवारी रोजी बीड जिल्ह्यात 7 तालुक्यातील 13 सरपंच, तर 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते.
जिल्हाधिकारी पाठक यांनी आता पुन्हा कारवाई करत 4 तालुक्यांतील 11 सरपंच व 402 सदस्यांचे सदस्यत्व 31 जानेवारी रोजी रद्द केले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील गावकारभाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.
आतापर्यंत बीड जिल्ह्यातील सरपंच व सदस्य अशा एकूण 844 जणांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ज्यांचे काही आक्षेप असतील त्यांच्या सुनावण्या घेऊन निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.