प्रजासत्ताक दिन : बीड जिल्ह्यात ‘या’ मंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण, वाचा…

टीम AM : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2025 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी 9.15 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी 8.30 ते 10 या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील. बीड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्री दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, अशी माहिती राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आली आहे.