चालकाचं प्रसंगावधान‌ : अनर्थ टळला….वाचा…

टीम AM : चालकानं प्रसंगावधान राखल्यानं अंबाजोगाई तालुक्यात बस अपघाताचा अनर्थ आज टळला. तालुक्यातल्या पठाण मांडवा घाटात प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाले. बस चालक पारजी उबाळे यांनी यावेळी प्रसंगावधान दाखवत बस घाटाच्या कठड्यावर आदळवली, बस घाटातल्या झाडांना अडकल्यानं अपघात टळला. बसमधील प्रवाशी बालंबाल बचावले.

दोन दिवसांपूर्वी चालकानं बसचे ब्रेक लागत नाही, असं सांगितलं होतं. त्यानुसार ब्रेकचे काम करून दिलं होतं. परंतू, ब्रेक ऑईलचा पाईप फुटला असावा आणि त्यामुळं ब्रेक निकामी झाले असावे, अशी माहिती अंबाजोगाई आगार प्रमुख अमर राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, अपघात झालेल्या बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा घाटात नागमोडी वळणं आहेत. यापूर्वी घाटात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे घाटातून वाहनं चालविताना खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here