मस्साजोग प्रकरण : बीडला सर्वपक्षीय मोर्चा, वाचा… 

टीम AM : मस्साजोग हत्या प्रकरणी तातडीनं दखल न घेतल्यास, आंदोलन तीव्र होऊन राज्यभर पसरेल, असा इशारा सर्वपक्षीय मोर्चातून देण्यात आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी बीड इथं निघालेल्या सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूकमोर्चानंतरच्या सभेतून हा इशारा देण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाची ‌भंभीर दखल घेत यातील आरोपींची‌ संपत्ती जप्त करण्याचे आदेश आज दिले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेला हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर विराट सभेत झालं. 

यावेळी व्यासपीठावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजीराजे, मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील, माजी आमदार सय्यद सलीम, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज यांच्यासह देशमुख कुटुंबीय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. वैभवी हिने यावेळी केलेल्या भाषणात आपल्या वडिलांना न्याय देण्याची मागणी केली.