टीम AM : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ काळजाचा थरकाप उडवणारी असतात तर काही व्हिडिओ भरपूर मनोरंजनात्मक आणि लोकांना हसायला भाग पाडणारी असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत एका शाळेतील शिक्षीका लावणीवर नृत्य करताना दिसत आहे.
शाळेच्या मैदानावर शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत मराठमोळ्या ‘अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी’ या गाण्यावर भन्नाट नृत्य करताना दिसत आहे. तर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी देखील आपल्या शिक्षिकेचे डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर sapana0014 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांंगलाच पसंतीस उतरला आहे. व्हिडीओवर कमेंट्सचा भरभरून वर्षाव झाला आहे. ‘ही कोणती शाळा आहे ?’ असे एकाने विचारले आहे. तर दुसऱ्या युजरने, नृत्य करणाऱ्या शिक्षिकेच्या एक्स्प्रेशनचे कौतुक केले आहे, एका युजरने लिहिलंय की, ‘शिकू द्या रे लेकरांना, उगाच नका नादी लावू’, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, ‘मुलांच्या शाळा आणि अभ्यासावर लक्ष द्या, हे आपल्याला आयुष्यभर कधीही शिकता येईल.’