टीम AM : मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीडसह राज्यात अहिल्यानगर, पुणे आणि गोंदिया या सात जिल्ह्यांच्या काही तुरळक भागात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
आज राज्यात सर्वात कमी किमान तापमान सोलापूर जिल्ह्यातील जेऊर इथं 5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. तर मराठवाड्यात नांदेड इथं 7 पूर्णांक 6, परभणी 8 पूर्णांक 2, बीड 7 पूर्णांक 5, तर धाराशिव इथं 9 पूर्णांक 4 दशांश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.