टीम AM : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महायुतीतल्या तीनही पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतील आहे. नागपूर इथं राजभवनात सायंकाळी हा शपथग्रहण समारोह पार पडला आहे.
बीड जिल्ह्यासाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्याला दोन मंत्रीपद मिळाले आहेत. परळीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंबाजोगाईत जल्लोष
आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई शहरात एकच जल्लोष केला. शहरातील मुख्य चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘मुंडे पर्व’ सुरु झाले आहे.