टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील युवकांच्या कारला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. उजनी येथील सहा महाविद्यालयीन युवक तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी जात असताना शनिवारी दुपारी औसा – तुळजापूर महामार्गावर शिंदाळा (लो.) गावाजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.
वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार लोखंडी कठड्याला धडकून उलटली. या अपघातात कार्तिक किरण गायकवाड (वय – 22, रा. उजनी) याचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ओमकार गिरी, शिवम गुट्टे, रोहन कांगणे, किरण कांगणे आणि राजेश भारती यांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेमुळे गायकवाड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उजनी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.