बनावट औषध प्रकरण : ‘सीबीआय’ मार्फत चौकशी करा, ‘स्वाराती’ समोर निदर्शने 

टीम AM : ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील बनावट औषधांच प्रकरण चांगलंच तापलं आहे. बनावट औषधाप्रकरणी विविध ‌माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. गोरगरिबांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार निश्चितच निंदनीय आहे. दरम्यान, आज दिनांक 12 डिसेंबर रोजी या घटनेच्या निषेधार्थ ‘स्वाराती’ रुग्णालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते कॉ.‌ बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.

या घटनेची ‘सीबीआय’ मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी करत जोरदार घोषणाबाजी केली. बनावट औषधाप्रकरणी कार्यवाही झाली नाही तर अधिष्ठाता कार्यालयाला‌‌ घेराव घालण्यात येईल, असा इशाराही कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी ‌दिला आहे. बनावट औषधाप्रकरणी अधिष्ठाता डॉ. धपाटे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. कचरे, डॉ. सिध्देश्वर बिराजदार, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. मोगरगेकर यांच्यासह आदी उपस्थित होते. 

दरम्यान, ‘स्वाराती’ रुग्णालयासमोर‌ करण्यात आलेल्या आंदोलनात धिमंत राष्ट्रपाल, अशोक पालखे, विनोद शिंदे, राजाराम कुसळे यांच्यासह आदी‌ जण सहभागी झाले होते. आंदोलनात महिलांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here