टीम AM : मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावात माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज भेट देत नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना खासदार पवार म्हणाले की, नागरिकांना ‘ईव्हीएम’ मशीन नको असेल तर हट्ट कशासाठी केला जात आहे. अमेरिका, युरोपसह इतर देशांमध्ये मतपत्रीकेवर मतदान घेण्यात येतं. तसंच मारकडवाडी गावातील नागरिक स्वतःच्या मतांची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर प्रशासनानं आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही, असेही पवार यांनी यावेळी सांगितलं.