‘लाडकी बहीण’ योजनेमुळे मतदारांवर प्रभाव पडला : पुन्हा नव्या उत्साहाने लोकांसमोर येऊ : शरद पवार

टीम AM : राज्य विधानसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कराड इथं निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणामुळे मतांचं ध्रुवीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला. 

महायुतीनं लोकांसमोर प्रभावीपणे त्यांचा कार्यक्रम मांडला, त्या तुलनेत आपल्याकडून प्रचारात कमतरता राहिल्याचं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी आपल्या सरकारच्या काळात झाली, त्यामुळे ओबीसी मतदार आपल्याविरोधात जातील हे मनाला पटत नाही, लाडकी बहीण योजनेमुळे मतदारांवर प्रभाव पडला असं त्यांनी सांगितलं. हा लोकांनी दिलेला निर्णय असल्याने, त्याची कारणमीमांसा करु, यावर अभ्यास करुन पुन्हा नव्या उत्साहाने लोकांसमोर येऊ, असंही पवार यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here