विधानसभा निवडणूक : सर्वच मंत्र्यांचा विजय, बीड जिल्ह्यात कोणी मारली बाजी ?, वाचा… 

टीम AM : विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदार संघात दणदणीत विजय मिळवला आहे. यासोबतच जवळपास सगळेच विद्यमान मंत्री देखील विजयी झाले. 

परळीमधून धनंजय मुंडे, सिल्लोड – अब्दुल सत्तार, उदगीर – संजय बनसोडे, येवला – छगन भुजबळ, कागल – हसन मुश्रीफ, परंडा – तानाजी सावंत, रत्नागिरी – उदय सामंत, श्रीवर्धन – आदिती तटकरे, सावंतवाडी – दीपक केसरकर, औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, मालेगाव बाह्य – दादा भुसे, जामनेर –  गिरीश महाजन, मलबार हिल्स – मंगलप्रभात लोढा, शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, पाटण – शंभुराज देसाई, अंबेगाव – दिलीप वळसे पाटील, तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. 

बीड जिल्ह्यात ‘यांचा’ विजय

बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, आष्टी मधून भाजप – महायुतीचे सुरेश धस, माजलगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, केज मतदारसंघातून भाजप – महायुतीच्या नमिता मुंदडा, तर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित विजयी झाले.