विधानसभा निवडणूक : केजचा आमदार कोण ? आज होणार फैसला, वाचा… 

टीम AM : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. प्रथम टपाली मतांची, तर साधारण साडेआठ वाजल्यापासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरच्या मतांची मोजणी सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिली. 

दरम्यान, केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत विद्यमान आमदार नमिता मुंदडा आणि माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यात तगडी लढत झाली. मतदारसंघाच्या जनतेनं कोणाच्या बाजूला कौल दिला, याच चित्र काही वेळातच स्पष्ट होईल. त्यामुळे निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणी होत असून, नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी स्वतंत्र मोजणी केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. 

दुपारी बाराच्या सुमाराला पहिला निकाल हातात येण्याची शक्यता असून, निकालाचं पूर्ण चित्र मात्र, संध्याकाळी स्पष्ट होईल, असंही एस. चोक्कलिंगम यांनी नमूद केलं.