टीम AM : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या दिवशी जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवावेत, असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविनाश पाठक यांनी निर्गमित केले आहेत.
बीड तालुक्यातील चौसाळा, गेवराईतील गेवराई, गुळज, मारफळा, राजपिंप्री, मालेगाव खु., किनगाव, शिरूर कासारमधील जाटनांदूर, मातोरी, पाटोद्यातील पिठ्ठी, आष्टी तालुक्यातील पिंपळा, दौलावडगाव, खडकत, आष्टा ह. ना. केरूळ, डोईठाण, हातोला, माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी, एकदरा, गंगामसला, माजलगाव, वडवणी तालुक्यातील वडवणी, अंबाजोगाईतील लोखंडी सावरगाव, केजमधील लव्हुरी, बोरगाव बु., परळी तालुक्यातील पोहनेर, नागापूर या ठिकाणी मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार अन्य दिवशी भरवावेत, असेही आदेशात नमूद आहे.