टीम AM : केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदारांसह उमेदवारांसाठी सी – व्हिजिल, सुविधा, मतदार मदतकेंद्र, ‘केवायसी’ हे मोबाईल ॲप आणि 1950 हा मोफत दुरध्वनी मदत क्रमांक आदी माहिती तंत्रज्ञान सेवा उपलब्ध केल्या आहेत.
मतदारांना आपल्या मतदार यादीतील नावांची माहिती व्होटर हेल्पलाईन ॲपद्वारे समजणार आहे. तर सी – व्हिजिल हे ॲप आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी उपयोगी आहे.
मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांचा तपशील, उमेदवारांची माहिती, ‘केवायसी’ ॲपद्वारे पाहता येणार आहे. मतदारांनी ‘केवायसी’ ॲपचा वापर करावा, असे आवाहन निवडणूक आयोगानं केले आहे.