टीम AM : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी अशा सर्जरी पुण्यातील एका रुग्णालयात करण्यात आल्या. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आली आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजीओप्लास्टी नंतरची काळजी घेण्यासाठी आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी बाळासाहेबांना एका वेलनेस सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील 4 – 5 दिवसांत बाळासाहेब आंबेडकर हे विधानसभा निवडणूक प्रचाराला येणार असल्याचेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
गुरुवारी 31 ऑक्टोबरच्या पहाटे त्यांना छातीत दुखू लागल्याने पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी होऊन आज बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.