विधानसभा निवडणूक : केजसाठी 47 उमेदवारांनी अर्ज केले दाखल, 11 महिलांचा समावेश, वाचा… 

टीम AM : राज्य विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी होणार आहे. उमेदवारांना चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दरम्यान, काल अर्ज दाखल करण्याच्या अखरेच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 

राज्यभरात 288 मतदार संघांसाठी एकूण 7 हजार 995 उमेदवारांचे 10 हजार 905 अर्ज दाखल झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली. बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात आतापर्यंत 409 उमेदवारांनी 566 अर्ज दाखल केले आहेत. 

केज विधानसभा मतदारसंघात काल अर्ज दाखल करण्याच्या अखरेच्या दिवशी 47 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात 11 महिला उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, केज विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारांनी वैयक्तिक भेटीवर भर दिला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तगडी लढत पाहायला मिळणार आहे, हे मात्र निश्चित आहे.