झोपायला जाताना काळजी घ्या… सापाचा हा व्हिडिओ एकदा बघाच, सोशल मीडियावर होतोय व्हायरल 

टीम AM : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ धक्कादायक तर काही काळजाचा थरकाप उडवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असताना दिसत आहे. या व्हिडिओत साप अशा ठिकाणी लपून बसला होता ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. अनेकदा साप अशा ठिकाणी लपून बसतात की, कोणाला शंकाही येत नाही. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका घरात चक्क बेडवरील उशीमध्ये साप लपला होता. यात तरुणानं झोपण्यासाठी उशीवर डोकं टेकवताच तो फणा काढून बाहेर आला. अन् पुढे त्यानं या तरुणासोबत काय केलं हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. व्हिडीओमध्ये एक विषारी साप हा बेडरुमच्या बेडवर असलेल्या उशीच्या कव्हरमध्ये लपलेला दिसत आहे. हे पाहून अनेकांची भंबेरी उडाली आहे. तरुणानं उशीवर डोकं ठेवताच त्याला काहीतरी हालचाल जाणवली आणि तो दूर झाला. अन्यथा सापानं त्याला दंश केला असता.

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, साप उशीच्या कव्हरच्या आत जाऊन बसला आहे. दरम्यान, या सापाला पाहताच कुटुंबीयांनी सर्पमित्रांना बोलावलं आणि त्यांनी मोठ्या सावधानतेनं या सापाला पकडले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, झोपायला जाताना काळजी घ्या. या पोस्टवर आता वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.