आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित, वाचा… 

टीम AM : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरचे आमदार सतीश चव्हाण यांनी 15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रम जाहीर करताच सतीश चव्हाण यांनी महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत प्रसिद्धी पत्रक काढले होते. त्यात त्यांनी बहुजनांचे प्रश्न सोडवण्यात महायुती सरकार अपयशी ठरल्याचा चव्हाण यांनी आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.