टीम AM : डॉ. अशोक थोरात यांची पुन्हा एकदा बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी वर्णी लागली आहे. डॉ. अशोक बडे यांच्या जागी त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
कोरोना काळात डॉ. अशोक थोरात यांच्या तत्परतेमुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले होते. यानंतर त्यांनी नाशिकमध्ये ‘सीएस’ म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची सहाय्यक संचालक म्हणून बदली झाली होती. आता पुन्हा तेथून ते बीडला ‘सीएस’ म्हणून येतं आहेत.
डॉ. अशोक बडे यांच्याकडे आता वैद्यकीय अधिकारी परभणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डॉ. अशोक थोरात पुन्हा बीडला आल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.