टीम AM : अंबाजोगाई - केज रस्त्यावरील चंदनसावरगाव जवळ ‘एसटी’ बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली आहे. बस मधील दहा प्रवाशांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील एक चालक व अन्य एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
अपघातातील काहींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अहमदपूर येथून छत्रपती संभाजीनगरला 50 प्रवाशी घेऊन ही ‘एसटी’ बस क्रमांक एमएच 20 बीएल – 2572 जात होती. केज तालुक्यातील चंदनसावरगाव जवळ असलेल्या मोरया हॉटेल जवळ ‘एसटी’ बस पलटी होऊन अपघात झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक चेंनाशेट्टी दाखल झाले. दरम्यान,अपघातात कसा झाला ? याची माहिती अद्याप समजलेली नाही.