पंतप्रधान मोंदीच्या हस्ते उद्या अंबाजोगाईतील कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ, वाचा… 

टीम AM : कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक/युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये ‘कौशल्य विकास केंद्र’ स्थापन करून महाविद्यालयीन युवक/युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने या विभागामार्फत ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेचा शुभारंभ दिनांक 20 सप्टेंबर शुक्रवार रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने बीड जिल्ह्यातील महाविद्यालयात होत आहे. अंबाजोगाईतील काही महाविद्यालयाचाही यात समावेश असून त्याही महाविद्यालयात उद्या शुभारंभ होत आहे. 

अंबाजोगाईतील महाविद्यालय :

◾यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई

◾कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स ॲन्ड इन्फॉरेमेशन टेक्नालॉजी, अंबाजोगाई

◾जय किसान महाविद्यालय आपेगाव, अंबाजोगाई

◾वसुंधरा कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स घाटनांदुर, अंबाजोगाई

◾पद्मश्री आप्पासाहेब पवार आर्टस, कॉमर्स ॲन्ड सायन्स सिनियर कॉलेज, अंबाजोगाई

◾खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई

तरी या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांनी महाविद्यालयात उद्धाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.