आमदारांचा निगेटिव्ह सर्व्हे : ‘महायुती’ चा उमेदवार बदलणार… वाचा.. 

टीम AM : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काहीच दिवसात लागण्याची शक्यता असताना आता राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आल्याचं दिसतंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अशीच एक बैठक पार पडली. ‘महायुती’ मध्ये एखाद्या आमदाराचा निगेटिव्ह सर्व्हे आला तर त्या जागेवर त्याच पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अजित पवारांनी त्यांच्या आमदारांना दिली. तसेच स्थानिक पातळीवर ‘महायुती’ चे नेते – कार्यकर्त्यांशी जुळवून घेण्याचा सल्लाही अजित पवारांनी दिल्याची माहिती आहे. 

विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीची 24 आणि 25 तारखेला दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत ‘महायुती’ त वाद असणाऱ्या जागांवर चर्चा होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीत तोडगा न निघणाऱ्या जागांबाबत दिल्लीत अमित शाह यांच्यासमवेत ‘महायुती’ च्या नेत्यांची बैठक होणार आहे. 

‘महायुती’ मध्ये एखाद्या आमदाराचा सर्व्हे निगेटिव्ह आल्यास त्या जागेवर त्याच पक्षाचा दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यात येणार असण्यावर एकमत झाल्याचं अजित पवारांनी आमदारांच्या बैठकीत सांगितलं. विधानसभा मतदारसंघातील वाद स्थानिक पातळीवर सोडवण्यावर भर द्यावा, याकडेही अजित पवारांनी आमदारांचे लक्ष वेधलं आहे.