टीम AM : बीड जिल्ह्यात ‘ईद – ए – मिलाद’ च्या सुट्टी संदर्भात महत्वाची अपडेट आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या संदर्भात अधिसूचना काढत सुट्टीच्या तारखेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. यात ‘ईद – ए – मिलाद’ ची सुट्टी 18 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ‘ईद – ए – मिलाद’ या सणाची सुट्टी सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी दर्शविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे वरील संदर्भीय शासन अधिसूचनेतील तरतुदीनुसार मुस्लिम बांधवांना ‘ईद – ए – मिलाद’ सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सामाजिक सलोखा व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या हेतूने बीड जिल्ह्यासाठी सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 करिता घोषित केलेली ‘ईद – ए – मिलाद’ ची सार्वजनिक सुट्टी रद्द करुन ती आता बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 या दिवशी जाहीर करण्यात येत आहे. या पत्रावर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची स्वाक्षरी आहे.