धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण योजना : ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

टीम AM : धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना’ सुरु करण्यात आली आहे.

इयत्ता बारावी नंतर तंत्रशिक्षण तसंच व्यवसायिक शिक्षण अभ्याक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या, परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. 

ही रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होईल, यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. इयत्ता बारावीमध्ये किमान 60 टक्के गुण असणारे धनगर समाजाचे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील आणि त्यांना जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल.