लग्नसराईत सोन्याचे दर वाढणार : आगाऊ बुकिंग सुरु, वाचा…

टीम AM : देशात सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यावर सोन्याचे दर 76 हजारांहून अधिक होण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेली वाढ आणि देशांतर्गत शेअर बाजारातही सोन्याने नवे उच्चांक गाठण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे यावर्षी सप्टेंबरमध्ये सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे. 

नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्नसराईसाठी ज्वेलर्सकडे आगाऊ बुकिंग सुरू झाली आहे. सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दागिन्यांची विक्री आणि आगाऊ बुकिंग 50 टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावा करण्यात येत आहे.