मुकुंदराज परिसरात दरड कोसळली : भक्तांना होतोय त्रास, वाचा… 

टीम AM : आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी स्थळाकडे जाणाऱ्या पायऱ्यावर दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे भाविक – भक्तांना दर्शन घेण्यासाठी जाताना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील पडलेली दगड तात्काळ हटविण्यात येवून रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी भक्तांच्या वतीने करण्यात येत आहे. 

अंबाजोगाई शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांत जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे नदी – नाले भरून तुडुंब वाहत आहेत. पावसामुळे सगळीकडे ओलावा निर्माण झाला आहे. अशातच शहरातील मुकुंदराज परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी स्थळाकडे जाणाऱ्या पायऱ्यावर दरड कोसळली आहे. सकाळी या परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ही बाब निदर्शनास आली. दरड कोसळल्याने भक्तांना मुकुंदराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेली दगड हटविण्यात यावी, अशी मागणी भक्तांच्या वतीने करण्यात येत आहे. 

उपाययोजना करण्याची गरज

आद्यकवी मुकुंदराज यांच्या समाधीकडे जाताना पायऱ्या उतरून जावे लागते. या पायऱ्यांच्या बाजूला डोंगराळ भाग असल्याने पावसामुळे सगळीकडे ओलावा निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी केंव्हाही दरड कोसळण्याची घटना घडून शकते. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने या परिसरात उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भक्तांच्या वतीने करण्यात येत आहे.