चांदणी चौकातील एका खोलीत राहत होता अक्षय कुमार : आज आहे 2500 कोटींचा मालक, वाचा… 

टीम AM : 90 च्या दशकात मुंबईच्या मायानगरीत अनेक मुलं अभिनेता होण्याची स्वप्त घेऊन आली. परंतू सर्वांनाच यश मिळाले नाही. अक्षय कुमार हा अशाच मुलांपैकी एक आहे ज्याला खूप मेहनतीनंतर यश मिळाले आहे. अक्षयने आयुष्यात खूप संघर्ष केला, आयुष्यात खूप चढउतार पाहिले आणि आज अभिनेता कोट्यवधींचा मालक झाला आहे. अक्षयने त्याच्या मुलाखतींमध्ये अनेक वेळा त्याच्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे, जी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. आज अभिनेता त्याचा वाढदिवस साजरा करत आहे, याचनिमित्त जाणून घेऊयात या अभिनेत्याचा कारकिर्दीतील प्रवास.

अक्षय कुमारचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी अमृतसर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. अभिनेत्याचे खरे नाव राजीव ओम भाटिया आहे. पण चित्रपट जगात अभिनेत्याने प्रवेश केल्यानंतर त्यांचे नाव अक्षय कुमार ठेवण्यात आले. एका सामान्य माणसातून अक्षय कुमार कसा सुपरस्टार झाला हे जाणून घ्या.

अक्षय कुमारची संघर्षकथा

अक्षय कुमारने पंजाबमध्ये 12 वीपर्यंत शिक्षण घेतले आणि पदवीसाठी प्रवेश घेतला. पण त्याला अभ्यास नको म्हणून त्याने पुढे शिक्षण सोडून दिले. अक्षयला मार्शल आर्ट शिकण्यासाठी बँकॉकला जायचे होते आणि यानंतर त्याच्या वडिलांनी अभिनेत्याला कर्ज काढून तिथे पाठवले. अक्षयने तिथे क्लास जॉईन केला आणि वेटरची नोकरीही स्वीकारली. पैसे कमावल्यानंतर अक्षय दिल्लीत आला आणि चांदणी चौक येथे एका घरात राहायला लागला. अनुपम खेरच्या शोमध्ये अक्षय कुमारने सांगितले होते की, ‘तो राहत असलेल्या खोलीत 10 – 15 मुले राहत होती. तेथे त्याने आर्टिफिशियल ज्वेलरीमध्येही काम केले आणि त्यानंतर तो काही काळ कोलकात्यातही राहिला.’ असे त्याने सांगितले. नंतर, अक्षय मुंबईला गेला आणि त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आणि मार्शल आर्टची शिकवणीही दिली.

अक्षय कुमारचे चित्रपट

अक्षय कुमारला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून जवळपास 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. या वर्षांमध्ये त्याने सुमारे 120 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी काही उत्कृष्ट चित्रपट आहेत. अक्षयने ‘तू खिलाडी में अनारी’, ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’, ‘खिलाडी का खिलाडी’, ‘संघर्ष’, ‘दिल तो पागल है’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘हाऊसफुल’, ‘एतराज’ या चित्रपटात काम केले आहे. , ‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’, ‘वेलकम’, ‘हमको दीवाना कर गये’, ‘आवारा पागल दीवाना’, ‘अजनबी’, ‘जॉली एलएलबी 2’, असे अनेक सुपरहिट चित्रपट अभिनेत्याने दिले आहेत. या चित्रपटानंतर अक्षय प्रत्येक चाहत्यांच्या घराघरात आणि मनामनात पोहचला आहे.

अक्षय कुमारची संपत्ती

अक्षय कुमारचे नाव भारतातील टॉप 10 अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 2024 मध्ये अक्षय कुमारची एकूण संपत्ती सुमारे 2500 कोटी रुपये आहे. भारतातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक पाचवा आहे. अक्षय कुमार एका चित्रपटासाठी 20 ते 30 कोटी रुपये घेतो. त्याचे स्वतःचे होम प्रॉडक्शन देखील आहे. ज्यामध्ये अनेक चांगले चित्रपट बनले गेले आहेत. चित्रपट आणि निर्मितीव्यतिरिक्त अक्षय कुमार जाहिराती आणि सोशल मीडियातूनही कमाई करतो.