टीम AM : राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक वेळेत होणार असल्याचे संकेत मिळत आहे. राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी वेळेतच तयारी सुरु करावी लागणार आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असल्याचे निश्चित झालं आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बैठक घेणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी हे निवडणूक कर्मचारी, मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र, मतदार यादी, कायदा आणि सुव्यवस्था, मतदान साहित्य याचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातील विधानसभा निवडणूका जाहीर होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.