टीम AM : अंबाजोगाई शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी – नाले भरून तुडुंब वाहत आहेत. पावसामुळे शहरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले तर अनेक सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अशातच एक अपघाताची घटना समोर आली आहे. शहरातील जैन गल्लीतील दगडाची भिंत कोसळल्याने कारचा अक्षरश चुराडा झाला आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरात गेल्या दोन दिवसांत जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे सगळीकडे ओलावा निर्माण झाला आहे. शहरातील जुन्या भागात अजूनही बरीचशी जुनी वाडे आहेत. त्यांची बांधकामं दगडाने केली आहेत. पावसामुळे या दगडाच्या भिंती ओलसर झाल्या आहेत. जैन गल्लीत चिमनगुंडे यांच घर आहे. त्यांच्या घराचही बांधकाम जुने असून दगडाचे आहे. पावसादरम्यान त्यांनी त्यांची मारुती कंपनीची कार घराशेजारी उभी केली होती. पावसामुळे भिंत ओली झाली असल्याने ती कोसळली आणि त्यातील दगड त्यांच्या कारवर पडली. या घटनेत कारचा एकदम चुराडा झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, जुनी दगडाची बांधकाम असणाऱ्या घरात राहणाऱ्यां नागरिकांनी खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.