राज्यभरात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा : अंबाजोगाईत पाऊस सुरु, वाचा…

टीम AM : राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला देखील पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, सातारा, नाशिक, नगर, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या तर मराठवाड्यात 5 सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

पुढील पाच दिवसात काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भातील 18 जिल्ह्यांमध्ये तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान आणि संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांत सोमवारी 2 सप्टेंबर रोजी अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवविलेली आहे.

अंबाजोगाईतही पाऊस सुरू

अंबाजोगाईत कालपासून पावसाचा जोर आणखी वाढला असून आज रविवारी पाऊस सुरुच आहे. त्यामुळे शेतातील कामे ठप्प झाली तर काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंबाजोगाईत पावसामुळे हवेत गारवा वाढला असून नागरिक उबदार कपडयांचा वापर करीत आहेत. अंबाजोगाई शहरासह तालुक्यात पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. विशेषत: सखल भागात पाणी साचल्याने तेथून नागरिकांना चालताना कसरत करावी लागत आहे.