माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला

टीम AM : केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ या गावात ही घटना घडली आहे. 

माजी आमदार संगिता ठोंबरे या 2024 ची विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असून गेल्या काही दिवसांपासून त्या मतदारसंघाच्या दौर्यात जनतेच्या भेटी घेत आहेत.

माजी आमदार संगिता ठोंबरे यांची गाडी

आज दिनांक 28 ऑगस्ट बुधवारी केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ या गावात त्यांच्या गाडीवर सांयकाळी हल्ला करण्यात आला. हा हल्ला कुणी केला ? याची माहिती अद्याप समोर आली नसून संगिता ठोंबरे यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. या हल्ल्यात त्यांना किरकोळ इजाही झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात माजी आमदार संगिता ठोंबरे यांना अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.