टीम AM : नव्या पिढीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य व विचार माहिती व्हावेत, या उद्देशाने साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त व्याख्यान आणि समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या सोबतच विशेष उपलब्धी मिळवलेल्या व्यक्तींचाही सन्मान कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमानिमीत्त प्रा. डॉ. पांडुरंग गादेकर यांच्या ‘साहित्याचे शिल्पकार डॉ. अण्णाभाऊ साठे’ या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पृथ्वीराज साठे तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. राजकुमार मस्के (उदगीर), डॉ. कमलाकर कांबळे हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम नगरपरिषदेच्या लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात दिनांक 31 ऑगस्ट शनिवार रोजी सांयकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘जोशाबा’ पुरुष बचत गटाच्या वतीने करण्यात आले आहे.