टीम AM : अंबाजोगाईत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना दिनांक 24 ऑगस्ट शनिवार रोजी रात्रीच्या सुमारास क्रांतीनगर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, शहरातील क्रांतीनगर परिसरात राहणाऱ्या ताहेर युसुफ शेख [वय – 27 वर्ष] या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत युवकाने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत. मयत युवकाचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. क्रांतीनगर परिसरातील स्मशानभूमीत मयत युवकाचा दफनविधी करण्यात आला.