टीम AM : राज्यात येत्या 72 तासांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर, नाशिक जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून नांदूर – दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणातूनही मोठा विसर्ग सुरु असल्यानं कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत आणि सखल भागातील नागरिकांना काळजी घेण्यासह सुरक्षितस्थळी स्थलांतराचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.
पुण्यासह सातारा जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा ‘लाल बावटा’ जारी झाला आहे.मधमेश्वर, दारणा, कडवामधून आणि भाम धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी विसर्ग सकाळी नऊ वाजेपासून होत आहे. तर, गंगापूर धरणातूनही दुपारी बारा वाजता पाणी विसर्ग केला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर गोदावरी नदीला पुर आला असून रामकुंड परिसरात लहान मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. यामुळं जयकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणातूनही मोठा विसर्ग सुरु असल्यानं कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत आणि सखल भागातील नागरिकांना काळजी घेण्यासह सुरक्षितस्थळी स्थलांतराचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. पुण्यासह सातारा जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी झाला आहे.