भरधाव कारने दिली धडक : पोलीस उपनिरीक्षकांचा मृत्यू, बीड जिल्ह्यात घडली घटना

टीम AM : पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी निघालेले दिंद्रुड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक श्रीधर नन्नवरे यांचा भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज रविवारी [दि. 7] सकाळी 7 च्या सुमारास नेकनूर हद्दीत झाला.

राष्ट्रीय महामार्ग 548 वरून आज सकाळी पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी सिरसाळ्याचे पीएसआय रमेश धोंडीराम नागरगोजे व दिंद्रुडचे पीएसआय श्रीधर नन्नवरे हे दुचाकी [एमएच 23 एके 9397] वरून जात होते. यावेळी स्विफ्ट कारने [एमएच 23 बीसी 2108] धडक दिल्याने यात श्रीधर नन्नवरे यांचा जागीच मृत्यु झाला तर नागरगोजे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.