टीम AM : इमारत कोसळण्याची घटना घडली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये ही दुर्घटना घडली आहे. शहरात सहा मजली इमारत कोसळली आहे. या घटनेनंतर ‘एनडीआरएफ’ आणि अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोहचली आहे. आतापर्यंत 7 जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहेत. परंतू, ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या अपघाताची माहिती मिळताच प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी, सुरत महापालिकेचे महापौर दक्षेश मावाणी, उपमहापौर नरेंद्र पाटील, भाजप आमदार संदीप देसाई, विरोधी पक्षनेत्या पायल साकारिया आणि अन्य नेतेही घटनास्थळी पोहोचले.
सहा वर्षे जुनी होती इमारत
इमारत 2017 मध्ये बांधण्यात आली होती. केवळ सहा वर्षांत 2024 मध्ये ती पडली. या इमारतीमध्ये मजुरी करणारे लोकच भाड्याने राहत होते. इमारतीच्या पाच फ्लॅटमध्ये लोक राहत होते. महानगरपालिकेने यापूर्वीच घरमालकांना नोटीस दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.