टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी या भागात उत्कृष्ट असे काम केले. वर्षभराच्या आतच त्यांची प्रशासकीय कारणास्तव बदली झाली. त्यांच्या जागी जिंतूर जि. परभणी येथील मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांची नियुक्ती सोमवार दि.1 जुलै रोजी करण्यात आली आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी वर्षभराच्या काळात या शहरात भरीव असे कार्य केले. प्रशासक आणि मुख्याधिकारी अशा दोन पदांचा भार त्यांच्यावरच होता. वर्षभरात त्यांनी नगरपरिषद उद्यान सुशोभीकरण, गरीब व सामान्य मुलांसाठी प्रशस्त अभ्यासिका तसेच त्यांनी गोरगरिबांसाठी असणाऱ्या रमाई आवास योजनेचा प्रश्न निकाली काढला. त्यांच्या कामाचे अंबाजोगाई शहरातून सातत्याने कौतुक होत गेले. त्यांची नुकतीच धाराशिव येथे बदली झाली होती. त्यांच्या जागी जिंतूर जि. परभणी येथून प्रियंका टोंगे यांची मुख्याधिकारी म्हणून राज्य सरकारच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे.