महावितरण कार्यालयावर धडकला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मोर्चा

शेतीपंपाचे वीज बील माफ करा : माजी आमदार पृथ्वीराज साठे

वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा द्यावी : तालुकाध्यक्ष अमर देशमुख

टीम AM : दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे संपूर्ण वीज बील माफ करा, यासह एकूण 5 मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर शुक्रवार, दिनांक 28 जुन रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी आणि वीज ग्राहकांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी आणि वीज ग्राहक सहभागी झाले होते.

शेतकरी आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आग्रही आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवार, दिनांक 28 जुन रोजी सकाळी 11 वाजता महावितरण कंपनीच्या कार्यालयावर माता रमाई आंबेडकर चौक येथून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज बील माफ करा, शेतकऱ्यांचे नादुरूस्त झालेले डीपी [ट्रान्सफॉर्मर] 24 तासांच्या आत दुरूस्त करून देण्यात यावेत, महावितरण कंपनीने स्वखर्चातून विजेचे झुकलेले खांब [पोल] बदलावेत व डिपी [ट्रान्सफॉर्मर] तात्काळ दुरूस्त कराव्यात. खराब झालेले वीज मीटर तात्काळ बदलण्यात यावेत,  घरगुती विज बिल दुरूस्त करून देण्यात यावेत, शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे नादुरूस्त झालेले डिपी [ट्रान्सफॉर्मर] आणण्याचे व ते दुरूस्त झाल्यानंतर पोहोचविण्याची जबाबदारी महावितरण कंपनीवर राहील. यासह विविध मागण्यांचा समावेश  मोर्चात करण्यात आला आहे. सदरील मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. 

सदरील निवेदनावर माजी आमदार पृथ्वीराज साठे, तालुकाध्यक्ष अमर देशमुख, यशोधन लोमटे, भगवान ढगे, बन्सीआण्णा जोगदंड, इमाम चौधरी, रामराम आडे, ॲड. इस्माईल चौधरी, ॲड. अविनाश भोसले, हमीद चौधरी, मुनवर भाई, फैजान मिर्झा, ज्योतिराम कुरणे, राजकमल देशमुख, सलिम पिंजारी, अंगद वाकडे, रमेश रेपे, रवि जोगदंड, सिध्दू लोमटे, शेख इम्रान, राहुल सिरसट, विकास, अमोल सरवदे, विनोद साळुंके, सुधाकर जोगदंड, लालासाहेब चव्हाण,सुयश मेंढके, अरूण साळुंके, रविंद्र मोरे, दिलीप पवार, राजाभाऊ साखरे, देविदास देवकते, रामभाऊ कुंडगर, अमन परदेशी, गणेश जगताप, गौतम मस्के, सादेक शाह, किरण पवार, तानाजी धुमाळ, पंकज मोरे, हनुमंत मोरे, आयुब पठाण, बालाजी धायगुडे, अमोल चव्हाण, गणेश अवताडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. महावितरण कंपनीच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात अंबाजोगाई शहर व तालुक्यातील शेतकरी आणि वीज ग्राहक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.