शेतपिकाच्या नुकसानीची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई- केवायसी करण्याचे आवाहन

टीम AM : माहे सप्टेंबर – ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेले शेतपिकांचे नुकसान आणि माहे मार्च – एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे व दुष्काळात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बीड जिल्ह्यातील 964804 बाधित शेतकरी लाभार्थ्यांना रुपये 717.09 कोटी अनुदान मंजूर झाले असून सदर अनुदानाचे संगणकीय प्रणाली मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वितरण सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 682812 शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रुपये 568.52 कोटी अनुदानाचे वितरण झाले असून उर्वरित 281992 शेतकरी लाभार्थ्यांपैकी 101196 लाभार्थ्यांच्या माहिती सबंधी दुरुस्ती करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आधार सेंटरवर जाऊन [BActive] करून घेणे व बँक खात्यास आधार मॅपिंग करण्यात यावे.

सद्यस्थितीमध्ये 180796 लाभार्थ्यांपैकी 72410 लाभार्थ्यांनी ग्रामस्तरावर प्रसिद्ध झालेल्या विशिष्ट क्रमांक यादी लिस्ट मधील अनुक्रमांकानुसार आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र येथे आधार प्रणानीकरण [ई- केवायसी] करणे आवश्यक आहे. याची तालुकानिहाय आकडेवारी खालील प्रमाणे आहे. खालील प्रमाणे शेतकरी यांनी [Vk नंबर] नुसार आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र येथे आधार प्रमाणीकरण [ई केवायसी] तात्काळ करून घेण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

अंबाजोगाई – 11673, बीड – 11000, आष्टी – 7166, धारुर – 7018, माजलगाव- 6926, केज – 6833, पाटोदा – 5634, शिरुर कासार – 4719, वडवणी – 4485, गेवराई – 4277, परळी – 2679 असे एकूण 72410 तसेच अंबाजोगाई, वडवणी व धारुर या तालुक्यात खरीप 2023 मध्ये दुष्काळ घोषित झाला असून या तालुक्यात 11089 शेतकरी लाभार्थ्यांनी आपली माहिती [आधार कार्ड व बॅक पासबुकची प्रत] संबंधित गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे.