पीकविमा भरताना ‘या’ चूका टाळा : अन्यथा विमा भेटणार नाही, वाचा… 

टीम AM : 2024 खरीप हंगाम पिकांचा विमा भरण्यासाठी कांही नवीन नियमावली जारी करण्यात आलेली आहे, दरवर्षी पीक विमा भरतांना कांही शुल्लक चुका होतात, यासाठी शेतकऱ्यांनी 2024 च्या खरीप हंगामासाठी ज्या नविन सूचना आल्या आहेत. त्या अनुषंगाने विमा भरावा, असे आवाहन बीड जिल्हा महा – ई केंद्र असोसिएशनचे अध्यक्ष सोहन टेकाळे यांनी केले आहे.

दुरुस्ती करुन घेणे अत्यंत गरजेचे

ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक व सातबारावर समान नावे नाहीत. या तिन्हीमध्ये थोडासाही फरक असेल तर पीक विमा मिळवण्यास अडथळा निर्माण होतो. काही शेतकऱ्यांच्या सातबारावर आडनावचं नसेल किंवा इतर कोणताही बदल झालेला असेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँकेचे पासबुक व सातबारा यात दुरुस्त करून या मध्ये समान नावे करून घ्यावीत, अशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याच्या अगोदरच आपल्या नावात दुरुस्ती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्यामध्ये फॉर्म अप्रुव्हल होणार आहेत. अन्यथा विमा भरलेला फॉर्म बाद होतील.

एकदा विमा भरला तर विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी किंवा विम्याचा फार्म भरणारे प्रतिनिधी काहीही करू शकनार नाहीत. नवीन नियमानुसार तुमचा सर्व डाटा समान असेल तरच विमा मिळणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांनी भरलेले फॉर्म रद्द होणार आहेत. त्यानंतर  केंद्रचालक जबाबदार राहणार नाहीत, तरी शेतकऱ्यांनी आपल्या नावात दुरुस्ती करून घ्यावीत, असे आवाहन बीड जिल्हा महा – ई केंद्र असोसिएशनचे अध्यक्ष सोहन टेकाळे यांनी केले आहे.