टीम AM : केज मतदारसंघाच्या विकासासाठी आणि त्यातल्या त्यात अंबाजोगाई शहरातील मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणाऱ्या माजी आ. संगीता ठोंबरे या विधानसभेसाठी इच्छुक असून त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. केज मतदारसंघात भेटीगाठीला प्राधान्य देऊन मतदारसंघातील मतदारांची त्या मतं जाणून घेणार आहेत.
या निमित्ताने जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते धनंजय कुलकर्णी यांच्या घरी जाऊन संगीता ठोंबरे यांनी भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली आहे. माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी केज मतदारसंघातील विविध समस्या आणि आर्थिक विकासाबाबतीत चर्चा केली.
यावेळी मतदारसंघातील शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न तसेच विजेची समस्या, ‘डिपी’ चे जळणे, महिना – महिना न मिळणे, पिकांचे नुकसान तसेच इतर विषयावरही त्यांनी कुलकर्णी यांच्यासोबत चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या चार महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत आणि माजी आमदार संगीता ठोंबरे राजकारणात सक्रिय होऊन केज विधानसभेची निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती अधिकृत सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.